महाराष्ट्राला सामाजिक न्यायाची दिशा दाखवून महाराष्ट्राला पुरोगामी बनविण्यात ज्यांचा मोठा आहे त्यात शाहू महाराजांचे नाव अग्रेसर आहे. म. फुले यांच्या नंतर पुरोगामी विचारांची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक नव्या क्रांतिकारी विचारांची देण दिली ते म्हणजे शाहू महाराज. आज त्यांची जयंती.
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत त्यांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
शिक्षण प्रसाराचे कार्य : -
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. तसा कायदाच त्यांनी बनविला. ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. मागास जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुकर व्हावे यासाठी त्यांनी वसतिगृहे सुरु केले.उपाशी पोटी शिक्षण घेता येणार नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. (Mid Day Meal - ही संकल्पना महाराजांनी सुरु केली.) एवढं करूनही जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाहीत त्यांना त्यांनी महिन्याला १ रु. दंड आकारण्यास सुरुवात केली.
केवळ शिक्षण देऊन चालणार नव्हते तर शिक्षणाचा फायदा असृपश्य वर्गास झाला पाहिजे म्हणून मोक्याच्या जागेवर त्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल हे महाराजांनी पाहिले. अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.मुलींच्या नोकरीची सोयही त्यांनी केली. डॉक्टर झालेल्या मुलीला त्यांनी नगरपरिषदेच्या दवाखान्याची प्रमुख बनविले.

अस्पृश्य जातींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न :
अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या महार समाजातील व्यक्तीस कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी अस्पृश्य वर्गातील पैलवानांना सरदार, अभंग,पंडित अशा पदव्या दिल्या .
राखीव जागांची तरतूद :
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली आणि त्याची लागलीच अंमलबजावणी केली. त्यांच्या या निर्णयास उच्च वर्गातून कडाडून विरोध झाला. मात्र शाहू महाराजांनी या विरोधाला भीक घातली नाही. महाराजांचा हा निर्णय अस्पृश्य वर्गाच्या जीवनात क्रांती करणारा ठरला. महाराजांचे हेच धोरण भारताच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आणि अस्पृश्य वर्गास स्वाभिमानाचे जगणे प्राप्त झाले.
क्रांतिकारी कायदे :
सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु महाराजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
नगरपालिकेत राखीव मतदारसंघ :
कोल्हापूर नगरपरिषदेचे प्रतिनिधी राजदारबारा मार्फत नेमण्याची प्रथा बंद करून राजषी शाहू महाराजांनी नगरपरिषदेमध्ये मध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यास सुरूवात केली. प्रत्येक जातीस लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ निर्माण केले. नगरपररषदेचे ४७ मतदारसंघ निर्माण करून ख्रिश्चन,मुसलमान, जैन, लिंगायत , वाणी, जंगम, तेली, सुतार, कुं भार, साळी, कोळी, लोहार, धनगर,पारधी, वडार, मांग, महार, चांभार, भंगी इत्यादी जातीचे ४७ उमेदवार निवडून दिले आणि चांभार समाजातील दत्तोबा पवार यांना नगर परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष केले.
'मूकनायकास' मदत :
दत्तोबा पोवार हे शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक होते. त्यांनी १९१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी परिचय करून घेतला होता. याच दत्तोबांनी डॉ. आंबेडकरांविषयी महाराजांना सांगितले. दलित समाजातील एक तरुण मुलगा शिक्षण घेऊन तयार झाल्याचे ऐकून महाराजांना आनंद झाला. त्या दोघांची भेट १९१९ मध्ये झाली. दोघांचे स्नेहबंध दृढ झाले. दलितांची बाजू जनतेसमोर आणि भारत दौऱ्यावर आलेल्या साऊथबरो समितीसमोर मांडण्यासाठी डॉ. आंबेडकरांना वर्तमानपत्राची गरज भासू लागली. ही बाब बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या कानावर घातली आणि वर्तमानपत्र सुरू करण्याची योजना त्यांच्यासमोर ठेवली. महाराजांना ही योजना पसंत पडली आणि त्यांनी वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी तत्काळ अडीच हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यातूनच ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू झाले.

माणगाव परिषद :
दत्तोबा पोवार, गंगाराम कांबळे, तुकाराम गणेशाचार्य, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे, निंगाप्पा ऐदाळे यांनी चर्चा करून माणगाव परिषद घेण्याची तयारी चालवली. त्यासाठी निंगाप्पा ऐदाळे डॉ. आंबेडकरांना भेटले. भेटीत २१ व २२ मार्च १९२० ही तारीख निश्चित करण्यात आली. त्या परिषदेत शाहू महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत; इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते हिंदुस्थानचे पुढारी होतील.’’
डॉ. आंबेडकरांनी अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला.डॉ. बाबासाहेब म्हणाले, " राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अस्पृश्यांना समानतेचे, बरोबरीचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिल्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी असले पाहिजे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो." शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केले होते.
बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी मोठे कार्य केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते" असे गौरवोद्गार काढले होते.
अश्या या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

✍️आयु. बुध्दजय भालशंकर
📱९९६०३७२७३६

.jpeg)
No comments:
Post a Comment