प्रवाहीपणा निसर्गाचा नियम. प्रवाहीपणा असेल तर नवीन कलाकृती तयार होते. जीवन अधिक सुंदर होते. उदाहरण द्यायचे झाले तर नदीचे देता येईल. प्रवाही असणारी नदी आपल्या प्रत्येक वळणावर जीवन फुलवत असते. एकदा का प्रवाहीपणा थांबला कि मग तयार होते ते डबके आणि डबके कधीच स्वच्छ नसते. घाणीची दुर्गंधी हे डबक्याचे वैशिष्ट्य. 'डराव डराव ' करणारी बेडकं हेही डबक्याचे दुसरे वैशिष्ट्य.
विचारांचंही तसंच आहे. विचार जर प्रवाही नसतील तर त्याचही डबकं तयार होत. आणि त्यात 'कट्टरता' नावाची घाण साठू लागते. आम्हांला समाजजीवनात सध्या अनेक डबके आढळून येत आहेत. कट्टरता कोणती का असेना ती वाईटच. विचारांची,नेत्याची किंवा मग ती धर्माची का असेना. कट्टरता तुमचा विचार मारत असते.
सध्या समाजसेवक , सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणारे लोक समाज सुधारण्याच्या कामगिरीवर आहेत. स्वतःमध्ये बदल न करता समाज बदलण्यासाठी धडपडणारी ही विद्वान लोकांची जमात. यातील मंडळी जेंव्हा म्हणतात- "आम्ही अमुक-तमुकचे कट्टर कार्यकर्ते,कट्टर भक्त" तेंव्हा आम्हांला साठलेल्या डबक्यात डराव डराव करणाऱ्या बेडकाचे चित्र आठवते. जेंव्हा अश्या विद्वानांसोबत चार गोष्टीवर चर्चा होते तेंव्हा त्यांनी कश्याप्रकारे स्वतःला एका चौकटीच्या बंधनात अडकवून घेतले आहे ते समजून येते. त्यांची 'डराव डराव ' त्या डबक्यापुरतीच असते. 'डरकाळी' फोडण्याची पात्रता असूनही केवळ कट्टरतेच्या डबक्यात पडून राहिल्याने ते केवळ 'डराव डराव' करीत असतात.
कट्टरपंथीय स्वतःला 'कट्टर' म्हणून घेण्यात अभिमान मानतात. तर एका अंगाने ते इतरांच्या कट्टरपणाला नावं ठेवतात. आपण स्वतःचीच फसवणूक करीत आहोत हेही यांच्या कधी ध्यानी मनी येत नाही. सारं काही सोयीनुसार सुरु असतं.कट्टरपंथीय लोकांनी स्वतःच्या धर्माला, नेत्याला आणि विचाराला एका बंदिस्त चौकटीत अडकवून ठेवले आहे. त्या चौकटीत बाहेरचा विचार प्रवेश करू शकत नाही. जे परंपरागत आहे तेच सत्य आहे. तेच प्रमाण आहे हे मानूनच माणसाने जगायचे. आमचा धर्म, आमचा देव ,आमचा महापुरुष, आणि आम्हीच मोठे असा यांचा अहंभाव. त्यामुळे महापुरुषाच्या विचाराची हत्या याठिकाणी रोजच होत असते. पण याचं दुःख कुणालाच होत नाही. कारण कट्टरतेने तुमच्या मनाबरोबरच मेंदूचाही खून केलेला असतो. त्यामुळे मेंदू विचारच करू शकत नाही.
कट्टरता अशी जमीन आहे- जिथे तुम्ही विचारांची शेती करू शकत नाही. नव्या विचाराचे बीज याठिकाणी रुजणारच नाही. ताबोडतोब ते खुडून टाकण्याची व्यवस्था केलेली असते. इथे फक्त द्वेषाचे पीक येते. त्यासाठी जास्त कष्ट करण्याची गरजही नाही.
सध्या तर सोशल मीडियाने कट्टरपंथीयांना बळ देण्याचे काम केले आहे. आपल्या जातीचे, धर्माचे,विचारांचे ग्रुप काढायचे. त्यावर यथेच्छ भाषेत इतरांचा उद्धार करायचा. आणि आपण कसे श्रेष्ठ हे भासविण्याचा प्रयत्न करायचा. इतरांना शिव्या शाप देणे हेच आपले 'सामाजिक कार्य' सध्या हे धोरण रूढ होत आहे. नवीन विधायक काही तरी निर्माण करण्याची भाषा कुणाच्याच तोंडी नाही. नव्या विचारांचे, नव्या आचारांचे स्वागत नाही. त्यामुळे विचारमंथन वगैरे शब्द गायब होऊ लागले आहेत. विचारमंथन याचा अर्थ नव्या पिढीला समजावून सांगण्याची वेळ आली आहे.
एकदा का तुम्ही कट्टरपंथीयांच्या घोळक्यात प्रवेश घेतला कि मग आत्मपरीक्षण करण्याच्या भानगडी पासून तुमची सुटका होते. चिकित्सा वगैरे करण्याचा उपद्व्याप थांबतो. तुम्ही तुमचा मेंदू एखाद्याच्या चरणी गहाण टाकलेला असतो. तो म्हणतो तेच खरं, नेता म्हणेल तीच पूर्व दिशा, धर्म ग्रंथ म्हणेल तोच खरा माणूस. इतर सारे शूद्र. परंपरा ,संस्कृती जे सांगत आली तेच बरोबर म्हणून पोरींवर आजही आम्ही बंधन घालून त्या सातच्या आत कश्या घरात येतील ,त्या कश्या बसतील, कश्या हसतील, कश्या बोलतील, कुणाशी बोलतील,काय नेसतील याचा निर्णय आम्हीच घेतो. बाई ही एक स्वतंत्र माणूस आहे .तिचा निर्णय ती स्वतः घेऊ शकते हेच आम्हांला मान्य नाही. खुळचट कल्पनांचा अभिमान बाळगून आम्ही समाजात वावरत आहोत. समाजप्रबोधनाची चळवळ करीत आहोत. कट्टरता आमच्या डोक्यात इतकी भिनली आहे कि आम्ही चुकत आहोत. आम्ही डबक्यात अडकून पडलो आहोत हेच मुळी मान्य होत नाही. कट्टरतेपणामुळे माणूस माणसापासून दूर जात आहे. मित्र, नातेवाईक तुटू लागले आहेत. आम्ही म्हणू तेच खरं , तुम्ही तसंच वागा अन्यथा तुम्हांला वाळीत टाकू हि भाषा माणुसकीची, माणूस जोडण्याची नाही. स्वतःची कट्टरता जपण्यासाठी इतरांचे मुडदेहि पाडण्यास आम्ही मागे पुढे पाहत नाही. माणुसकीला काळिमा फासत आहोत ,आम्ही कट्टरता निर्माण करून.
महापुरुष, विचार आणि धर्म ही कुण्या एकट्याची मक्तेदारी किंवा जहागिरी नाही. त्यामुळे त्यांना कट्टरतेच्या चौकटीत बंदिस्त करू नका. कट्टरतेच्या अज्ञानपणामुळे आधीच या देशात वर्णव्यवस्थेची घाण निर्माण झाली आहे. ती अजून साफ होता होईना.
त्यामुळे कट्टरतेच्या डबक्यातील बेडकांना आमचं इतकंच सांगणं आहे कि - " नवीन घाण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. नेहमी प्रवाही रहा. प्रवाही राहिल्याने घाण साठत नाही. त्या सिद्धार्थानेही हेच सांगितलं आहे. थांबलेले चक्र त्यानेच तर गतीमान केलं होत. सम्यक ज्ञान देऊन मानवी जीवन गतिमान करण्याचा मार्ग त्यानेच तर आम्हांला दिला. त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. कट्टरता सोडा. गतिमान व्हा. प्रबुद्ध व्हा."