Saturday, October 7, 2017

"अनुभव कहता है


"अनुभव कहता है
खामोशियाँ ही बेहतर हैं,
शब्दों से लोग रूठते बहुत हैं..."

 जिंदगी गुजर गयी....
 सबको खुश करने में ..

जो खुश हुए वो अपने नहीं थे,
जो अपने थे वो कभी खुश नहीं हुए...

कितना भी समेट लो..
हाथों से फिसलता ज़रूर है..

ये वक्त है साहब..
बदलता ज़रूर है..
 इंसान की  अच्छाई  पर,
       सब खामोश  रहते हैं...

चर्चा अगर उसकी बुराई पर हो,
    तो गूँगे भी बोल पड़ते हैं..!!!
     
      (Source - unknown)

Monday, August 14, 2017

"हिंदूराष्ट्र : वेडगळ कल्पना"




"भारत हे खरेखुरे धर्मनिरपेक्ष राज्य बनविण्याचा काँग्रेस सरकारचा निर्धार आहे. हिंदूराष्ट्र ही वेडगळ कल्पना आहे." हे विधान पं. नेहरूंचे नाही किंवा म.गांधी यांचेही नाही. तर हे विधान आहे स्वयंसेवकांना प्रातःसमयी वंदनीय असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे. १९४८ च्या काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात बोलताना त्यांनी हे विधान केले. १९४८ साली केलेल्या या विधानाची आठवण आता होण्याचे कारण म्हणजे नुकतेच १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली आणि त्यांनतर सभागृहात दिल्या गेलेल्या "जय श्री राम" च्या घोषणा. सध्या देशाच्या महत्वाच्या पदावर आरएसएसचे स्वयंसेवक विराजमान झाले आहेत. त्यामुळे हिंदुराष्ट्राचे स्वप्न अनेकांना दिवसा पडत आहे. सोशल मीडियावरही हिंदू राष्ट्रवाद जोरात सुरु आहे. त्यामुळे 'भक्तजमातीला' भानावर आणण्यासाठी आम्हांला पटेलांच्या विधानाचा आधार घ्यावा लागला. इतरही अनेक नेत्यांची विधाने आहेत. पण हे नेते सध्या अडगळीत पडले आहेत. थोडक्यात त्यांची "चलती" बंद झाली आहे. याची प्रचिती कोविंद यांच्या भाषणाने नेहरूंचा उल्लेख वगळून दिली आहे. देशाच्या सर्वोच पदावरील व्यक्ती देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव विसरते यातच सर्व काही आले.

          त्यामुळे आम्ही पटेलांचे विचार दिले आहेत. १९५० साली  पटेल म्हणतात, "आपले राज्य धर्मनिरपेक्ष आहे. येथे प्रत्येक मुसलमानाला वाटले पाहिजे की, तो भारताचा नागरिक आहे आणि भारतीय नागरिक म्हणून त्याला समान हक्क आहेत. आपण जर त्याला असे वाटण्यापासून वंचित केले तर आपण आपल्या संचित वारशाला व देशाला पात्र पात्र ठरणार नाही." मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भयभीत झालेल्या मुस्लिम समुदायाला कदाचित हे विधान आधार देणारे ठरेल आणि हिंदुराष्ट्राचा उदोउदो करणाऱ्या जमातीच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरेल. 'स्टॅचू ऑफ युनिटी' च्या माध्यमातून पटेलांचा १८२ मी. उंच पुतळा उभारणाऱ्या जमातीने पटेलांची वैचारिक उंची गाठण्याचा थोडातरी प्रयत्न करावा. जेणेकरून धर्मनिरपेक्ष देशाला धर्माधिष्टित राष्ट्र  बनविण्याचा चाललेला उद्योग तरी थांबेल.
       मुळातच हिंदुराष्ट्र म्हणजे काय? काय चमत्कार होणार आहे भारत हिंदुराष्ट्र झाल्यावर. देशातील ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे. बेरोजगारी हद्दपार होणार आहे. सर्वच सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत? देशाची अर्थव्यवस्था चीन, अमेरिकेला मागे टाकणार आहे? बेघरांना घर भेटणार आहे. शिक्षण स्वस्त  होणार आहे.? शाळेच्या भरमसाठ फी इतक्या कमी होतील की पालकांना "फी वाढवा" म्हणून आंदोलन करावे लागेल.?  गायी सोबतच "बाई" देशात सुरक्षित होणार आहे?  का हिंदुराष्ट्रात संस्कृती जपण्यासाठी तिची जीन्स टी शर्ट हद्दपार होणार आहे. सगळ्या महिला, मुलींना साडी घालावी लागणार आहे. 
       आमच्या हिंदुराष्ट्राला म्हणे फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याचा टेंभा मिरवायला आम्हाला लाजही वाटत नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्था. मनूने दिलेला वारसा आजही जपला जातोय. त्यामुळेच तर धर्म जात वाचविण्यासाठी लोकांचे मुडदे पडत आहेत. हे हिंदुराष्ट्रात आणखी मोठ्या प्रमाणात घडणार आहे. आणि याचसाठी आम्हांला हिंदुराष्ट्र हवे आहे. एकीकडे 'हे विश्वची माझे घर' असा नारा द्यायचा आणि जातीयवाद धर्मवाद जपायचा हेच तर खरे हिंदुराष्ट्र.
       ज्या संस्कृतीची आम्हांला लाज वाटायला हवी. जी संस्कृती आम्ही लाथाडायला हवी तीच संस्कृती निर्लज्जपणाने, बिनडोकपणाने, गर्वाने मिरवीत आहोत. ज्या संस्कृतीने इथल्या माणसाचे माणूसपण नाकारले. हजारो वर्ष त्याला त्याच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवले त्याच संस्कृतीचे हिंदुराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न केला जातोय. निव्वळ मूर्खपणाच आहे. जे राष्ट्र धर्माचा पायावर उभे राहिले त्यांची अवस्था काय झाली आपण जाणतोच. सारखे-सारखे त्याची आठवण करून देण्याची गरज नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्याकडे नजर टाकली तर समजून येईल.
    आमच्या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. ज्याने त्याने त्या अधिकाराचा वापर करावा. पण घटनात्मक प्रमुख पदावर आरूढ झालेल्या व्यक्तीला कोणत्याही धर्माचे, जातीचे लेबल लावून चालणारे नाही. ती लेबले तिथेच काढून  ठेवली पाहिजेत. धर्माधिष्ठित संघटनेचा स्वयंसेवक पदावर आरूढ झाला म्हणजे आता आमच्याच धर्माचे राज्य येणार असे म्हणत नाचणे म्हणजे निव्वळ बकवासपणा.
     हिंदुराष्ट्र. मुळातच भारत एक राष्ट्र केंव्हा होता? राष्ट्रवाद आम्हाला माहित तरी होता का? राष्ट्रवाद कश्यासोबत खातात याची तरी माहिती होती का? इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर आम्हांला राष्ट्र नावाचे काही तरी असते वगैरे वगैरे समजायला लागले. भारतात असणारी सर्व संस्थाने खालसा करून डलहौसीने १८५६ पर्यंत या भारतावर एकछत्री सत्ता आणली आणि त्या नंतर मग हळूहळू भारत नावाच्या राष्ट्राने इंग्रज शासनकाळात आकार घेतला. त्यामुळे प्राचीन काळी भारत एक राष्ट्र होते आणि त्यात हिंदुराष्ट्र. मोठा जोकच म्हणावा लागेल. ज्या ज्या महाराजांनी भारतावर राज्य केले त्यातील किती हिंदू राजांनी  संबंध भारतावर राज्य केले? दिल्लीच्या गादीवर कोणता हिंदू राजा बसला होता.?  त्यामुळे अंधभक्तांनो भूतकाळात भारत कधी हिंदुराष्ट्र नव्हता आणि भविष्यातही होणार नाही. कारण हा देश एका धाग्याने एकसंध केला आहे. तो धागा आहे "भारतीय संविधानाचा". आणि हा धागा कोणीच तोडू शकणार नाही. "संविधानरूपी" धाग्यात हा देश आता बांधला गेला आहे.  
       "विविधतेत एकता" हाच या देशाचा पाया आहे. घटनेने याच पायावर प्रत्येक भारतीय नागरिकास अधिकार दिले आहेत. भाषेपासून कपड्यापर्यंत खाण्यापिण्यापासून धर्मापर्यंत या देशात विविधता आहे. इतकी सारी विविधता असूनही एकसंध देश म्हणून भारत जगात ओळखला जातो. भारताचे कौतुकच मुळात यासाठी जागतिक पातळीवर होते आणि हे सारे शक्य झाले आहे ते "भारतीय संविधानामुळे".  "विविधतेत एकता" हेच सूत्र घटनाकारांनी दिले आहे आणि तेच सूत्र आपण जपले पाहिजे. प्रत्येकाची विविधता जपतच हे राष्ट्र बलवान होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या  धर्माची,जातीचे लेबले थोडा वेळ बाजूला  ठेवून या विविधतेचा विचार करावा आणि देश इतकी विविधता असूनही एकसंध का टिकून आहे याचाही विचार केला तर समजून येईल की येथे आपणास कोणताही धर्म,भाषा, संस्कृती कुणावरही थोपवून चालणार नाही. ते कुणाच्याही भल्याचे नाही. त्यामुळेच १९४८ साली जे पटेलांना वाटले तेच आज आम्हां प्रत्येक भारतीयाला वाटले पाहिजे की " हिंदुराष्ट्र ही एक वेडगळ कल्पना आहे." 
 
 -बुद्धजय भालशंकर (अभियंता )
मो. ९९६०३७२७३६