Thursday, March 2, 2017

भीमटोला म्हणजे वर्मावर घाला


       बुद्धजयजी आपले "भीमटोला"  पुस्तक वाचले अन वाटलं की आपण फुले, शाहू,   आंबेडकरांचा  सांगावा घेऊन आलात. आपण व्यवसायाने अभियंता, सुंदर इमारती उभ्या करणं आपलं काम पण आपण असाही एक अभियंता आहात की जो सुसंस्कृत समाजमनाची सुंदर इमारत उभी करण्याचे काम भीमटोलाच्या माध्यमातून करत आहे. 
   शब्दांना आकार देणे सोपं असतं पण त्यांना आत्मा देणे  अवघड असतं.आपल्या लेखणीतून शब्दांना आपण आत्मा दिला म्हणून भीमटोला गाजतो आहे.

                     " भले तर देऊ कासेची लंगोटी,
                       नाठाळाच्या माथी हाणू काठी "


या संत तुकारामाच्या वचनाप्रमाणे आपली लेखणी कार्य करते आहे. ज्याच्या त्याच्या कामाचे मोल आपण भीमटोलाच्या माध्यमातून करत आहात.  आपणांस हे बाळकडू लहानपणापासूनच प्यायला मिळाले हे आपलं भाग्यच म्हटलं पाहिजे.
     माश्यांच्या पिलांना पोहायला शिकवावं लागत नाही. वाघाच्या पिलांना शिकार करायला शिकवावं लागत नाही. मोर पिसांना रंग द्यावा लागत नाही. एवढंच कशाला म्हणतात ना, "गवयाचं लेकरू सुरातच रडतं" त्याचप्रमाने आपणास लिहायला सांगावं लागत नाही. बहुजन आवाजच्या माध्यमातूनही आपल्या लेखणीचा सुगंध आम्हां पर्यंत पोहचतो आहे. आपली लेखणी रसिकांच्या मनःपटलावर अशीच अधिराज्य गाजवत राहो ही सदिच्छा व आपल्या कार्यास आभाळभर शुभेच्छा! 
 


आयु. भास्कर गायकवाड (मुख्याध्यापक )
वेळापूर, ता. माळशिरस

No comments:

Post a Comment