"भीमटोला" मुळे समाजकार्याचा रथ नक्की पुढे जाणार
भीमटोला हे पुस्तक हातात घेतले आणि सुरवातीचे काही लेख लगेच वाचूनही काढले. अतिशय बेधडक पणे बुद्धजय याने लिखाण केले आहे. आजच्या तरुण पिढीचे वाचन, लिखाण नाही. पण बुद्धजय याला अपवाद आहे. घणाघाती लिखाणाची त्याची शैली जबरदस्त आहे. बाबासाहेब एकदा म्हणाले होते की, " समाजकार्याचा रथ जो मी इथपर्यंत आणला आहे तो पुढे नेता नाही आला तरी चालेल पण मागे मात्र नका नेऊ. " बुद्धजयचा भीमटोला वाचून मनात नवीन आशावाद निर्माण झाला आहे की हा रथ नक्की पुढे जाईल. ती ताकद मला बुद्धजयच्या लिखाणात दिसून येते. अभियंता लेखक कसा असू शकतो हा खरा तर मोठा प्रश्नच आहे, आणि तोहि इतका झुंजार लेखक. कुणाचीही भीडभाड न ठेवता बुद्धजयने जे वास्तव आहे तेच मांडलं आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन. संपूर्ण महाराष्ट्रभर हे पुस्तक पोहचलं पाहिजे. चळवळीच्या घरात हे पुस्तक असलंच पाहिजे. तरुण वर्गाने बुद्धजयच्या पुस्तकाचे वाचन जरूर करावे. बुद्धजयला भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.
प्राचार्य दिलीप कसबे
![]() |
प्राचार्य दिलीप कसबे
वळसंग, जिल्हा सांगली

No comments:
Post a Comment