भाच्चीकडून मामाचे कौतुक
---------------------------------------
माझी भाच्ची कु. ऐश्वर्या गायकवाड, घोडेगाव ( पुणे ) येथे राहते. सध्या ती ८ वी मध्ये शिकत आहे. ४ दिवसांपूर्वी तिने 'भीमटोला 'पुस्तक सोलापुरातून नेले. मामाचे पुस्तक आहे याचं तिला फार कौतुक. घरी गेल्या गेल्या तिने पुस्तक वाचले आणि लगेच प्रतिक्रिया पण दिली. तिच्या वयाला जे कळते ते वाचले ,मामा पुस्तक लय भारी आहे असा अभिप्राय आला. ऐश्वर्याचे खूप खूप आभार.
'भीमटोला 'ची भाषा आबालवृद्धांना आवडत आहे. प्रत्येक वर्गाला हे पुस्तक आपले वाटत आहे. वाचताना खूपच चांगलं वाटत आहे. मेंदूत काहीतरी अजब घडत आहे असं वाटतं ,अशी प्रतिक्रिया प्रत्येक वाचकांकडून येत आहे. 'भीमटोला ' प्रत्येक वाचकाला आपलासा वाटत आहे याचे समाधान भेटत आहे. आपण काही तरी नवे करू शकलो आणि समाजातील लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे हा आनंद खूप मोठा आहे. लाखो रुपये कमावता येतील ,पण लाख मोलाची माणसं आणि प्रेम नाही कमवता येतं , हे प्रेम मला भेटत आहे याचा खूप अभिमान वाटत आहे.
ही सारी पुण्याई महामानवाच्या कष्टाची आणि भारतीय संविधानाची !
---------------------------------------
माझी भाच्ची कु. ऐश्वर्या गायकवाड, घोडेगाव ( पुणे ) येथे राहते. सध्या ती ८ वी मध्ये शिकत आहे. ४ दिवसांपूर्वी तिने 'भीमटोला 'पुस्तक सोलापुरातून नेले. मामाचे पुस्तक आहे याचं तिला फार कौतुक. घरी गेल्या गेल्या तिने पुस्तक वाचले आणि लगेच प्रतिक्रिया पण दिली. तिच्या वयाला जे कळते ते वाचले ,मामा पुस्तक लय भारी आहे असा अभिप्राय आला. ऐश्वर्याचे खूप खूप आभार.ही सारी पुण्याई महामानवाच्या कष्टाची आणि भारतीय संविधानाची !
No comments:
Post a Comment